टेलिपॅथी (Telepathy) म्हणजे काय? दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे शक्य आहे का?
तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का? तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विचार करत असता आणि नेमका त्याच क्षणी तिचा फोन येतो किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येतो. एखाद्या मित्राला काहीतरी सांगायचे असते आणि तोच विषय तो अचानक तुमच्यासमोर काढतो. किंवा बऱ्याचदा दोन व्यक्तींच्या मनात अगदी एकाच वेळेला तोच शब्द येतो. आपण याला योगायोग म्हणून सोडून देतो. आईला आपला मुलगा काही न सांगताही त्याच्या मनात काहीतरी बिनसल्याची जाणीव होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, हे असं का घडतं? असे अनुभव आल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, “आपण खरंच दुसऱ्याच्या मनातील विचार जाणू शकतो का?” मानवी मन आणि मेंदूची ही एक अशी अनाकलनीय बाजू आहे, जिला आपण टेलिपॅथी (Telepathy) किंवा मनाचा संवाद म्हणतो. अशा प्रकारे टेलीपॅथीची संकल्पना निर्माण झाली आहे. काही लोक टेलिपॅथीचा संबंध सहाव्या इंद्रियाशी जोडतात, तर काही जण यामागे मेंदूची कार्यपद्धती, निरीक्षणशक्ती, अनुभव आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया असल्याचे मानतात. विज्ञान याला अजून पूर्णपणे मान्यता देत नसले , तरी मानवाच्या इतिहासात आणि अन...